Loading...

About Us

जय गुरुदेव खास वैशिष्ट्ये:

जास्तीत जास्त वैश्य उद्योजकांचा सहभाग

दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून

कुटुंबासोबत शॉपिंगचा खास अनुभव

स्थानिक वैश्य उत्पादकांना बळ देण्याची संधी

वैश्य बाजार पेठ परिवारात आपले स्वागत आहे ! वैश्य बाजार पेठ, व्यवसायातील गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचे प्रतीक आहे, आपल्याला उत्कृष्ट सेवा प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग आहे.1 मे 2017 रोजी स्थापन झालेल्या या महाराष्ट्र बाजार पेठेने आपला प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम व बुद्धिमत्तेच्या आधारावर ग्राहकांना दर्जेदार सेवा पुरवली आहे.

वैश्य बाजार पेठेची स्थापना 1 मे 2017 रोजी झाली. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्ता या महाराष्ट्र बाजार पेठेच्या मूलभूत तत्त्वांनी सामान्य व्यक्तीला असामान्य यश प्राप्त करण्यासाठी सक्षम केले आहे. या तत्त्वांच्या आधारावर, आम्ही व्यवसायात मानक उचलतो आणि आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

वैश्य बाजार पेठ

हे आपल्या ग्राहकांना 1 मे 2017 पासून उत्तम दर्जाचे किराणा सामान आणि ब्रँडेड प्रॉडक्ट्स पुरवत आहे. आम्ही ग्राहकांना योग्य भाव, घरपोच सेवा, आणि ब्रँडेड सामानावर आकर्षक डिस्काउंट्स देत आहोत.

वैश्य बाजार पेठ ने ग्राहकांशी मजबूत बांधिलकी साधून आपल्या नावाचे एक विश्वासार्ह ब्रँड तयार केले आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत 50,000 हून अधिक ग्राहकांना आमच्या उत्कृष्ट सेवेद्वारे समाधान देणारी दादर - मुंबई येथील एकमेव बाजार पेठ म्हणजेच वैश्य बाजार पेठ. वैश्य बाजार पेठच्या परिवारात तुमच्या सहभागामुळे तुम्ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बाजार पेठेसोबत जोडले जाल आणि एक यशस्वी व्यावसायिक म्हणून नावारूपास येणार आहात.

WHy US

Why Choose Us

स्वातंत्र्यपूर्व काळात "परदेशी मालाची होळी करा आणि स्वदेशी वापरा" हा नारा दिला गेला. आज पुन्हा एकदा त्याच विचारांची खरी गरज आहे. परंतु यावेळी फक्त स्वदेशीच नव्हे तर आपल्या वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी वैश्य बांधवांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची वेळ आली आहे.

आपला बांधव कोणत्याही व्यवसायात किंवा नोकरीत असो — त्याची उन्नती म्हणजे आपल्या समाजाची उन्नती. हाच आपल्या वैश्य गुरूंचा खरा संदेश आहे.

*याच उद्देशाने, इतिहासात प्रथमच, अखिल वैश्य समाजाच्या सौजन्याने "वैश्य ग्राहक पेठ २०२५"*

*या प्रदर्शनात बहु संख्या ने वैश्य व्यावसायिक एकत्र येऊन आपल्या समाजाच्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन घडवतील. आता आपली जबाबदारी आहे — प्रत्येक वैश्य बांधवाने सामूहिक सहभाग देऊन या उपक्रमाला उत्सवाचे स्वरूप द्यावे. *अखंड प्रयत्न करून लहान-मोठ्या वैश्य व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणत आहेत. त्यामागे उद्दिष्ट एकच — आपण एकसंघ असले पाहिजे.*

जसे आपल्या वैश्य उद्योगपती विवेक माणगावकर सर नेहमी सांगतात: *"माणसे कमवा, पैसे आपोआप मागे येतात. आपण पैशाच्या मागे धावू नये, तर पैसा आपल्या मागे यायला हवा."*

तर चला, आता आपण सर्वांनी एकत्र येऊया, आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावूया आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.

वैश्य बाजार पेठेचा व्यवसाय अन्नधान्य, कडधान्य आणि गृहउपयोगी वस्तूंच्या रिटेल आणि होलसेल क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेला आहे. आपल्या सामर्थ्याच्या आधारे, आम्ही विश्वासू आहोत की तुम्ही आपल्या व्यावसायिक गतीने यशस्वीतेच्या नवीन उंचीवर पोहोचाल.

वैश्य बाजार पेठेचा व्यवसाय अन्नधान्य, कडधान्य आणि गृहउपयोगी वस्तूंच्या रिटेल आणि होलसेल क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेला आहे. आपल्या सामर्थ्याच्या आधारे, आम्ही विश्वासू आहोत की तुम्ही आपल्या व्यावसायिक गतीने यशस्वीतेच्या नवीन उंचीवर पोहोचाल.

वैश्य बाजार पेठेचा दृष्टिकोन

वैश्य बाजार पेठेचा उद्दिष्ट संपूर्ण महाराष्ट्रभर एक सुसंगत गृहउपयोगी वस्तु भांडारांची श्रुंखला स्थापन करणे आहे. मुंबईत पाच आणि पुण्यात पाच गृहउपयोगी वस्तु भांडार उभारले जातील. या दृष्टिकोनानुसार, वैश्य बाजार पेठेचा परिवार अठरा वर्षांच्या कालावधीत संपूर्ण वैश्य अठरा हजार कोटी रुपयांची गृहउपयोगी वस्तु भांडारांची विशाल श्रुंखला उभारण्याचे लक्ष ठेऊन आहे. या योजनेद्वारे, आम्ही ग्राहकांना उच्च दर्जाच्या गृहउपयोगी वस्तू प्रदान करून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यास वचनबद्ध आहोत.

वैश्य बाजार पेठची कार्य प्रणाली (MISSION)

"सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जीवनात लागणारे विविध प्रकारचे किराणा सामान व गृहउपयोगी वस्तू उत्तम दर्जाचे आणि योग्य भावात ग्राहकांना उपलब्ध करून देणे हाच वैश्य बाजार पेठ परिवाराचा नैतिक उद्देश आहे. आम्ही मुंबईमध्ये या कार्यात उत्कृष्टता साधत आहोत. भविष्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा देऊन प्रत्येक सामान्य व्यक्तीला व्यवसायिक बनवण्याची आमची दृढ संकल्पना आहे."

वैश्य बाजार पेठ परिवार: ( About Us )

वैश्य बाजार पेठच्या विश्वस्त कमिटीचे सदस्य हे उच्च शिक्षित व अनुभवी व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे विविध व्यवसाय क्षेत्रात 18 ते 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आम्ही व्यवसायिक व्यवस्थापनात उच्च तज्ज्ञतेची उंची गाठली आहे आणि प्रत्येक कमिटी सदस्याच्या व्यवसायातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र बाजार पेठ परिवारातील विश्वस्त कमिटीचे कार्यक्षेत्र हे अत्यंत व्यावसायिक आणि प्रमाणिक आहे, जे व्यवसायाच्या यशस्वी व्यवस्थापनाची हमी देते.

*✨ विश्वासाचे नाते - वैश्य ग्राहक पेठ ✨*